Saturday 17 August 2019

मुलांसाठी जादू कि झप्पी

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख

जादू कि झप्पी हा डायलॉग मध्ये खूप गाजला. मुन्नाभाई एमबीबीएस या फिल्ममध्ये संजय दत्त जो कोणी अडचणीमध्ये असतो त्याला जादू की झप्पी देतो. 
एक मैत्रीपूर्ण मिठी म्हणजेच जादू कि झप्पी लहानपणी मुलांना मिळणे गरजेचे असते. ती जर मिळाली नाही तर मोठ्यापणी व्यक्तिमत्त्वामध्ये काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते.
लहानपणी पालकांचा मायेचा स्पर्श मुलांना सातत्याने मिळणे निकोप वाढीसाठी अत्यंत गरजेचे असते.  तुम्ही म्हणाल, आम्ही पालक आमच्या लहानग्याला नेहमी कडेवरच घेत असतो. नेहमी त्यांना मायेची ऊब मिळत असते. पण लहान म्हणजे फक्त एक ते दोन वर्षांची मुले नाही. आपले मुलं दहा-बारा वर्षाचे  होईपर्यंत जादूची झप्पी देणे आवश्यक आहे.
जेव्हा आई, आजी मुला-मुलींना त्यांच्या नातवंडांना मांडीवर घेऊन थोपटत असते किंवा त्यांना जवळ घेऊन गप्पागोष्टी करत असते तेव्हा आईच्या स्पर्शाची संवेदना ही मुलांसाठी अविस्मरणीय असते. अशा स्पर्शातून अर्थात संवेदनेमधून ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन स्त्रावते.
या हार्मोनचा भविष्यात व्यक्तीच्या स्वभावावर खूप मोठा परिणाम होतो. ऑक्सिटोसिन हार्मोनचे काम विश्वासाचं नातं प्रस्थापित करणे असते. 
लहानपणी मुलांना मायेची ऊब किती मिळाली आहे, त्याला किती प्रेमाने मांडीवर घेऊन डोक्यावरून हात फिरवला आहे, त्याला किंवा तिला किती मिठीमध्ये घेऊन स्पर्शाने प्रेम माया दिली आहे त्यावर हे प्रमाण अवलंबून असते.
जर शरीरामध्ये ऑक्सिटोसिन प्रमाण बरोबर असेल तर ती व्यक्ती विचारी, शांत व सर्वात महत्वाचे विश्वासु स्वभावाची बनू शकते आणि याउलट जर हे प्रमाण कमी असेल तर ती व्यक्ती चिडचिडी, संतापी आणि सर्वात महत्त्वाची संशयी वृत्तीची बनू शकते. जेव्हा मोठेपणी व्यक्ती खूप संशयी वृत्तीची असते तेव्हा समजावं लहानपणी त्याच्या मेंदूत ऑक्सिटोसिन चे प्रमाण कमी निर्माण झालं याचाच अर्थ आई वडिलांचा, आजी-आजोबांचा प्रेमाचा स्पर्श कमी उपलब्ध झाला.
पुढे संशयी वृत्तीच्या माणसाबरोबर ऍडजेस्ट करणे खूप कसरतीचे असते. जगात सर्वांवर औषध आहे पण पॅरानिया म्हणजेच संशयी वृत्ती वर नाही. मला सांगा कोणाला नाना पाटेकर ची भूमिका असलेला अग्नी साक्ष फिल्म मधला नवरा आवडेल?.. जो मनीषा कोइराला बाजारात गेल्यावर विचारतो, "बोलो इतना वक्त लगता है क्या.." 

संशयी लोकांबरोबर व्यावसायिक व्यवहार करणे सुद्धा कटकटीचे होते. हेच जी व्यक्ती सातत्याने विश्वासास पात्र असते, दुसऱ्यांवर नेहमी विश्वास ठेवते आणि विश्वासू स्वभावाची असते तिच्याबरोबर नातेसंबंध उत्तम राहतात. हे सर्व अवलंबून असते मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन चे प्रमाण किती आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा लहानपणी मुलांना किती प्रेमाने मायेने स्पर्श केला आहे त्यावर अवलंबून असते. आई जेव्हा बाळाला जवळ घेऊन दूध पाजते तेव्हा याचे प्रमाण सर्वात जास्त वाढत असते. मग मुलगा मुलगी जसजशी मोठी होत जातात तस तसे पालक त्याला किती जवळ घेऊन आनंदी रिलॅक्स वातावणात घेऊन बसतात त्यावर अवलंबून असते.
आपण मुलं नर्सरी ज्युनिअर केजी मध्ये असेपर्यंत म्हणजेच चार पाच वर्षाची असेपर्यंत मुलांना जवळ घेऊन बसतो आणि मायेचा विश्वासाचा स्पर्श देतो पण सहा सात वर्षाची झाल्यानंतर हे प्रमाण कमी होते आणि मुलं जशी दुसरी तिसरी ला आले की ते पूर्ण थांबते.
पालकांनी मुलांना रोज एक तरी मिठी मारावी, डोक्यावर हात फिरवून विचारपूस करावी. या वयातच ऑक्सिटोसिन चे प्रमाण वाढते आणि मुलं 10-12 वर्षाची झाली की हे प्रमाण अत्यंत अल्प होत असते.
पालकांनो मुलं शाळेत जातांना किंवा घरी आल्यावर एक तरी जादूची झप्पी द्या. मुलांना मोकळ्या वातावरणात जवळ घेऊन गप्पागोष्टी करा आणि संवेदनाक्षमता वाढवा. संवेदना क्षमतेतुनच विश्वासू स्वभावाचे भविष्यातील नागरिक बनतील. आपल्याला विद्यार्थ्यांचा I.Q पेक्षा E.Q वाढवायचा आहे. शिक्षकांची पण तेवढीच जवाबदारी आहे.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक



1 comment:

Devanand Chavan said...

सर आपला मोबाईल नंबर द्याल का प्लिज आपणास बोलायचे आहे
सर आपले अप्रतिम काम चालू आहे मनःपूर्वक शुभेच्छा

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...