ओशो मागील शतकातील अतिशय बुद्धिवान व्यक्तिमत्व अजून तरी या एकविसाव्या शतकात इतका बुद्धीमान व्यक्तिमत्व घडलेला नाही. मी ओशो खूप वाचतो आणि त्यांचा शिक्षण संदर्भातील दोन मोठे ग्रंथ जे दोन दोन हजार पानांचे आहेत. ते प्रत्येक वेळेस वाचले की नवा अर्थ निघतो.
ओशो एका ठिकाणी म्हणतात की लहान मुलांना शिकवण्यासाठी जेवढे उच्चशिक्षित टीचेर्स पाठवाल तेवढं ते लहान मूल घडेल. ते सर्व शिक्षक बालवाडी मध्ये शिकवायला पाठवा जे खूप शिकले आहे. प्री-प्रायमरी मध्ये Ph.D झालेले उच्चशिक्षित शिकवणारी टीचेर्स हवे.
विद्यार्थी जसजसा मोठा होतो तो स्वतः शिकत असतो म्हणून मोठ्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मॉन्टेसरी टीचर शिकवायला पाठवा कारण व्यक्तिमत्व विकास करायला काही राहिलेला नसतो सर्व लहानपणी होऊन जातात
आता तर मेंदू शास्त्राने हे सिद्ध पण केलेल आहे.
त्यामुळे मला वैयक्तिक असं वाटतंय जेवढे विद्यार्थी लहान.. पहिली.. दुसरी.. तिसरी मध्ये शिकवणारे टीचर हे खूप शिकलेले.. सर्वात जास्त माहिती असलेले हवे.
या वयातच कुतूहल जागं होत असतात.
त्यामुळे जे शिक्षक लहान मुलांना शिकवायला तयार होतात ते खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व घडवतात. तुम्हाला जर देश घडवायचा असेल तर उच्चशिक्षित शिक्षकांनी लहान विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. कारण ते पाया बांधत असतात.. कळस तर कोणीही चढवतो.
त्यामुळे लहान मुलांना शिकवायला जाण म्हणजे तुमचं प्रमोशन असतं हा मुद्दा नीट समजून घ्या.
आपल्याकडे उलट असतं तुम्ही जेवढे जास्त शिकाल तेवढे तुम्ही मोठ्या विद्यार्थ्यांना शिकवतात आणि त्यांना शिकवणं म्हणजे प्रतिष्ठेचं मानतात.
मी जर एक दिवसासाठी शिक्षण मंत्री झालो तर कॉलेजला मिळणारा पगार हा नर्सरी ते पाचवीच्या टीचर ला करेल आणि प्री प्रायमरी - प्रायमरी टीचर चा पगार हा प्रोफेसरला करेल आणि जेवढ्या लहान मुलांना तुम्ही शिकवला जाईल तेवढे तुमचा प्रमोशन असं जाहीर करेल.
सचिन उषा विलास जोशी