Sunday 5 July 2020

"शिक्षक गुरु का फक्त शिक्षक'"

आज गुरुपौर्णिमा
त्यानिमित्त माझे विचार मी मांडत आहे..
"शिक्षक गुरु का फक्त शिक्षक'"

गुरू
गुरु आयुष्य कसं जगावं ते सांगतो..
जो हरवल्याना रस्ता दाखवतो.
गुरु हा तत्वज्ञानी असतो.

प्रत्येक व्यक्ती स्वतःचे अध्यात्मे घेऊन जगत असतो.
हे अध्यात्मिक ज्ञान येथे गुरूकडून..

गुरु तुमच्या जीवनाची फिलॉसॉफी बनवतो. म्हणून आयुष्यात योग्य गुरु निवडणे आवश्यक. इथे निवड चुकली तर अडचण होऊ शकते..

गुरु कोणीही असू शकतो, मग तो आई-वडील, मित्र मैत्रीण, भाऊ, सहकारी, शिक्षक.. कोणीही..
ज्यावर तुम्ही विश्वास ठेवतात व त्यांच्या विचार तुम्ही स्वतःचे मानतात आणि ते तुमचे जीवनसूत्र बनवतात. ते प्रत्यक्ष तुमच्या जीवनात हवे असे नसते जसे ओशो पासून तर सध्याच्या तरुणांचा ताईत बनलेले संदीप माहेश्वरी.

शिक्षक
शिक्षक हा शिकवण्याचे कार्य करतो.
भारतीय तत्त्वज्ञानात गुरु आणि शिक्षक हे वेगळे समजले जातात.
आज शिक्षक दिन नाही.
शिक्षक विद्यार्थ्यांना कौशल्य शिकवतो तर गुरु ते कौशल्य आयुष्यात कसे वापरायचे ते शिकवतो.

शिक्षक हा म्हणजे शाळेतला शिक्षक असा संकुचित शब्द नसून पालक सुद्धा शिक्षक असतात किंबहुना ते लहान मुलांच्या आयुष्यातील पहिले शिक्षक असतात

प्रश्न हा आहे टीचरला गुरू होता येते का?
तर नक्कीच हो!!

जो शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये शिकवता शिकवता एक ऊर्जा निर्माण करू शकतो तो गुरु होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतो.

ही ऊर्जा असते "तू करू शकतो" या मानस प्रक्रियेची..

शिक्षक तेव्हा गुरू होतो जेव्हा तो त्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाही तर शिक्षणाची तहान निर्माण करतो. आपल्याकडे म्हण आहे, घोड्याला तलावा जवळ नेता येते पण तलावातील पाणी पी असं करता येत नाही.
जर घोड्याला तहानच लागली नसेल तर तो का बरं पाणी पेईल? गुरु ती तहान निर्माण करतो.

आपल्या भारताला असे शिक्षण हवे आहे जे त्यांच्या त्यांच्या विषयात गुरु बनतील आणि विद्यार्थ्यांना जगण्याची प्रेरणा देतील.

विद्यार्थी आयुष्यात कधी नैराश्य अनुभवणार नाही आणि नैराश्य आलं तर त्यांना शिक्षकांचे ते शब्द आठवतील जे तुम्ही त्याला शाळेत शिकवता शिकवता सहज सांगितले होते. त्या क्षणी तुम्ही शिक्षक नाही.. गुरू झालात.

तमाम अश्या पालकांना, शिक्षकांना गुरुपौर्णिमा च्या शुभेच्छा
आणि पालक-शिक्षक ते गुरु होण्याच्या प्रक्रियेला ऑल द बेस्ट.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...