Saturday 17 August 2019

विदयार्थ्यांना सृजनशील व्यक्ती बनवण्यासाठी..


भारत हा येत्या काही वर्षात जगातला सर्वात तरुण असलेला देश म्हणून संबोधला जाईल.
दुसऱ्या देशाच्या तुलनेने भारतात युवकांची संख्या सर्वाधिक असेल. पण या तरुणांना भविष्यासाठी तयार करावयाचे असेल तर पहिले आजच्या शिक्षण पद्धती मध्ये आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. आपण सामाजिक, आर्थिक परिस्थितीनुसार मुलांच्या शैक्षणिक भविष्या बाबत निर्णय घेतो. पालक त्यांच्या पाल्याला नर्सरी मध्ये प्रवेश घेतांना त्याला/तिला डॉक्टर / इंजिनियर करायचे ठरवूनच शाळा निवडतात. खरतर विविध रिपोट सांगतात सन 2040 मध्ये अधिक सृजनशील, निर्माणक्षम अशी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. जर भारतातील तरुण आपल्याला सृजन हवे असतील तर आज शाळा-शाळांमध्ये जे शिक्षण आणि शिक्षण वातावरण आहे, शिक्षणातील जी रचना आहे ती सर्व बदलली पाहिजे. नुसतीच शाळेची नाही तर घरा घरा मध्ये पालकत्वाचे विचार बदले पाहिजे.
मनुष्य सृजनशील होण्यासाठी घरात आणि शाळेत काय बदल केले पाहिजे़? तरुण अधिक निर्माणक्षम होण्यासाठी शिक्षणात काय बदल केला पाहिजे की जेणे करुन सृजनशील व्यक्ती घडतील. याचा विचार होणे आवश्यक आहे.
अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री. मिहाली यांनी यावर बरेच संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनपर गं्रथात मुलभूत प्रश्न हा उपस्थित केला होता की सृजनशील व्यक्ती ही लहानपणा पासूनच सृजनशील असेल कां? तिला जन्मत: हे सर्व गुण मिळाले असतात कां? याचे निष्कर्ष असा आहे की बालाकाच्या वातावरणात योग्य ते बदल घडवून आणले तर ते बालक मोठयापणी अधिक सृजनशील बनते. कुठलाही व्यक्ती जेव्हा सृजनशील तसेच निर्मितीक्षम बनते तेव्हा ती घटना एका-एकी होत नसते किंवा हा बदल एका रात्रीत होत नसतो. तर त्यामागे प्रचंड मेहनत सातत्याने परीश्रम घेतले असतात. यामध्ये जिज्ञासा, कुतहल आणि कुठल्या ना कुठल्या गोटीं मध्ये रस वाटणे या मानस पातळीवर होणाऱ्या प्रक्रिया घडणे गरजेचे असते.
प्रश्न हा आहे सध्याच्या किती शाळा मुलांमध्ये जिज्ञासावृत्ती, कुतुहल जागृत करते? एखाद्या विद्यार्थी कशात रस दाखवत असेल तर त्याला आजची शिक्षण पद्धती प्रोत्साहन देते कां? पालक घरा मध्ये क्रिएटिव्हिटीला महत्व देता का?
बालपणी रस निर्माण होण्यासाठी एखादी प्रेरणा आवश्यक असते.
मिहाली म्हणतात, प्रेरणा ही त्या बालकाला दिलेली कौतुकाची थाप असेल अथवा सर्वांसमोर एखादी कला सादर केलेली असेल याचा मोठयापणी त्या मुलांला / मुलीला सृजनशील बणवण्यात महत्त्वाचा ठरतो. मिहाली पुढे सांगतो फक्त कशात रस असल्याने सृजनशीलता वाढते असे नसून बालकास लहानपणी विविध अनुभव मिळणे ही आवश्यक असते. लहान वयात विविध गोष्टी करुन बघण्याची संधी मिळणे हा निर्माणक्षमचा पाया असतो.
त्यामुळे विद्यार्थ्यांना असे शिक्षण हवे जेणे करुन त्याला विविध अनुभव मिळतील, शाळेने असे काही नियोजन केले पाहिजे की सातत्याने विद्यार्थ्याला त्यांचे रस असलेल्या गोष्टी सादर करण्याची संधी मिळाली पाहिजे.
शाळेत असे वातावरण हवे की जिथे सर्व शिक्षक कशान्कशात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतील. प्रोत्साहनातून कौतुक अन्कौतुकासाठी विविध संधी उपलब्ध करुन देणे हे शाळेचे प्राथमिक काम असले पाहिजे.
तसेंच शाळेची रचना अशी असावी की त्यातून त्यातून विद्यार्थ्यांना सातत्याने नव नवीन संकल्पना, विचार, आयडिया सुचल्या पाहिजे. निसर्ग, चित्र, कला, शिल्प यांची अशी काही सांगड असली पाहिजे की शाळेचे वातावरण हे निर्मितीक्षमसाठी पुरक बनेल.
बालपणीचा काळ हा घडणीचा काळ असतो. इमारत जेवढी उंच बांधायची असेल तेवढे खोल पाया मजबूत बांधावा लागतो. माणसांच्या व्यक्तीमत्त्वाचे पण तसेच असते. उत्तुंग व्यक्तीमत्त्व घडण्यासाठी पहिले 12 वर्षे महत्त्वाचे. या वयात घरातून आणि शाळेतून कसे वातावरण मिळते त्यावर कितीतरी गोष्टी भविष्यात अवलंबून असतात. सृजनशीलतेचा पाया भक्कम करण्यासाठी घर आणि शाळेने सतत उपक्रमशील असणे आवश्यक आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...