Saturday, 17 August 2019

लहान चिमुकल्यांना कसे वाचवायचे मोठ्यांच्या लैंगिक स्पर्शातून?

भारतामध्ये दर 15 मिनिटांनी एक लहान मुला मुलींवर लैंगिक अत्याचार होत असतात असा सरकारचाच रिपोर्ट सांगतो. महिला आणि बाल विकास मंत्रालयाचा एका सर्वे नुसार 53 टक्केहून अधिक लहान मुलांनी सांगितले की, त्यांना कधी ना कधी लैंगिक अत्याचाराला सामना करावा लागला आहे. म्हणून की काय रॉयटर सारख्या जगप्रसिद्ध वृत्तसंस्था म्हणते, भारत म्हणजे लहान मुलांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक देश.

जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराबद्दल आपण ठोस पावले उचलली पाहिजे. जेव्हा आपण ठोस पावले म्हणतो तेव्हा तुमच्या मनात आले की पोलीस, सरकार यांनी अजून मेहनत घेतली पाहिजे.. पण ते त्यांचे कार्य करत आहे. मी तुम्ही आपण सगळे काय करू शकतो याचा विचार करण्याची गरज आहे.

प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतात.. पालक म्हणून माझी काय जबाबदारी आहे? पहिली जबाबदारी म्हणजे मुलांना मोकळ्या खेळीमेळीच्या वातावरणात ही संकल्पना शिकवणे. लहान मुलं म्हणजे मुलं आणि मुली दोघे. कारण अत्याचार फक्त लहान मुलींवर नाही तर लहान मुलांवर सुद्धा तेवढाच होतो. एक सर्वेनुसार bad touch अनोळखी लोक देत नसून त्या लहान मुलांच्या आयुष्यातील ओळखीचे लोक जास्त देतात. नातेवाईक, शेजारचे, कॉलनीमध्ये, मोठ्या भावाचे मित्र, बस ड्रायव्हर, इत्यादी सर्व यात येतात. शक्यतो हे वयात आलेले 16 ते 24 वर्षाचे तरुण तर कधीकधी 50 साठी मधील जेष्ठ नागरिक सुद्धा या लहान मुलांच्या अत्याचारांमध्ये आढळून येतात.. जे नातेसंबंधांमधे असतात.

आता आपल्या तीन ते आठ वर्षाच्या मुलांच्या बाबतीत व्हायचे नसेल तर काय करायला हवे?
आई किंवा वडिलांनी मुला मुलीला जवळ घेऊन हा विषय सहज पद्धतीने कुठलेही चेहर्यावर टेन्शन घेता समजून घ्यावा.

त्यांना विचारा डेंजर हा शब्द ऐकला आहे का?
डेंजर च्या विरुद्ध अर्थी काय असते? ते म्हणतील safe.. मग त्यांना संपूर्ण शरीराचे भाग शिकवा. Head, Hand, Legs, stomach हे झाले body part पण काही असतात प्रायव्हेट पार्ट.. म्हणजे काय? जे part कपड्यांनी झाकतो किंवा कव्हर करतो ते झाले प्रायव्हेट पार्ट. आपण जेव्हा पोहायला तरण तलावात उतरतो तेव्हा सुद्धा हे बॉडी पार्ट झाकले असतात.

या प्रायव्हेट पार्ट ला कोणीही हात लावू शकत नाही.
असे तिन जागाआहे जिथे कोणी हात लावू शकत नाही. एक chest दोन bottom आणि तीन part between legs. हे तीन एरिया मुलांन कडून दोन-तीनदा म्हणून घेणे. त्यांना चित्रातून किंवा प्रत्यक्ष दाखवणे. त्याच वेळेस त्यांना हे सांगणे की, फक्त या प्रायव्हेट पार्ट ला आई-वडील अंघोळ घालतानाच हात लावू शकते आणि डॉक्टर सुद्धा या प्रायव्हेट पाटला हात लावू शकतो पण तेव्हाच जेव्हा तिथे आई किंवा वडील स्वतः उपस्थित असतील. ज्या घरात आजी-आजोबा असतात त्या घरातील मुलं हमखास हा प्रश्न विचारतील की आजीने हात लावला तर चालतो का? तेव्हा सांगा हो पण आपल्या आजी आजोबांनीच हो.. नाकी शेजारच्या किंवा दुसऱ्या कुठलाही आजोबांनी.

आपण एक कोरा कागद घेऊन safe circles आणि friends relative circle याची लिस्ट मुलांकडून करून घेऊ शकतो. त्यांना सांगा safe सर्कल मध्ये जे येतात तेच प्रायव्हेट पार्ट ला हात लावू शकतात. या safe सर्कल मध्ये तीनच लोक येतात..आई-वडील आणि डॉक्टर.

फ्रेंड सर्कल मध्ये दादा, दादांचे फ्रेंड, कॉलनीमधील मुलं, काका-मामा, चुलत भाऊ, शेजारचे, ड्रायव्हर, शाळेमधील अंकल, हे सर्व दुसऱ्या सर्कल मध्ये येतात.

समजा यामधील लोकांनी आपल्या private part ला हात लावला तर काय करशील? तेव्हा त्याला सांगा समजा कोणी हात लावला तर जोरात "No नाही" हा शब्द मोठ्याने ओरडायचा. त्याच्याकडून तसे ओरडून घ्यायचे. त्यानंतर तू जोरात त्या जागेवरून पळून जायचे आणि जसे आई-बाबा भेटतील त्यांना लगेच सांगायचे.
येथे एक गोष्ट आवर्जून आपल्या मुलांना सांगा की सीक्रेट असं काही नसतं. तुला कोणी सांगितले की हे आपल्या दोघांमधील सिक्रेट आहे तरी ते तू आम्हाला सांग. आई वडील आणि मुलांमध्ये सिक्रेट काही नसते.. आई-वडील किंवा टीचरला सिक्रेट सांगितले तर चालते..

आता हे सर्व सांगून झाल्यावर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्याच्या किंवा तिच्या कडून Roll Play करून घ्या. सर्व शब्दांची उजळणी करून घ्या..
दर पंधरा दिवसांनी त्याला विचारा की कोणी प्रायव्हेट पार्ट ला हात लावायचा प्रयत्न केला का? तो किंवा ती नाही म्हंटले की फक्त आठवण करून द्या की ओरडायचे कसे.. समजा तो किंवा ती हो म्हणाली तर ताबडतोब विश्वासात घेऊन सर्व घटना समजून घ्या आणि त्यावर त्वरित action घ्या.

काही मुलं डायरेक्ट सांगू शकत नाही. कुणी अत्याचार केला तर हा मुळात हा अत्याचार आहे हेच त्यांना माहीत नसतं, आशा वेळी मुलांची छोट्यातली छोटी तक्रार पण पालकांनी समजून घ्यायला हवी, जसं की ते ड्राइवर काका मला नाही आवडत/ मला रिक्षा मध्ये नाही जायचं, तर हा लैंगिक अत्याचाराचा परिणाम देखील असू शकतो. याचा अर्थ पालकांनी सतत हीच चिंता वाहायची असं नाही, तर पालकांनी सजग राहणं हे अतिशय महत्त्वाचे आहे.

पालकहो, तुमचं घरातील वातावरण आनंदी आणि मोकळ ठेवा म्हणजे लहान मुले मुली तुम्हाला मनमोकळ्या पद्धतीने सहज शेअर करु शकतील. लोक काय म्हणतात ते महत्वाचे नसून माझ्या चिमुकलीला काय म्हणायचे आहे ते महत्वाचे.

तुम्हाला मुलांना हे शिकवताना ओशाळले होत असेल तर माझा यूट्यूब वर विडिओ आहे. Good Touch Bad Touch Espalier असे search करा. त्यात पालकांनी पाल्या ला कसे सांगायचे ते पण आहे किंवा मी या लहान मुलांशी या विषयावर बोललो आहे ते संवाद जरी दाखवले तरी चालतील. पण तुम्ही स्वतः या विषयावर बोललात तर अधिक विश्वासाचे नाते प्रस्थापित होईल.
तर चला तर मग आज पासून आपण सर्व या लहान मुला मुलींची काळजी घेऊ.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक




No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...