Saturday, 17 August 2019

माझ्या लाडूला


माझा एक वकील मित्र सांगत होता की त्याच्याकडे एक घटस्फोटाची केस आलीकेस अशी होती की नव नवीन लग्न झाले होतेनवरा पगार झाला की बायकोच्या हाती द्यायचाबायको पहिल्या चार-पाच दिवसातच सर्व पगार शॉपिंग वर खर्च करून मोकळी व्हायचीअसे दर महिन्याला होत गेलेत्यामुळे नवऱ्याच् आर्थिक गणितं चुकलीतो तिला म्हणाला की पैसे जपून खर्च कर करत जात्यावरून भांडण करून बायको माहेरी गेलीतिच्या आईने जावई ला बोलावून सांगितले की, "तिची हाउस मौज पुरावापैसे कमी पडले तर माझ्याकडून घ्या". हे सासुबाई चे वाक्य ऐकून मुलगा तडक उठला आणि त्याने घटस्फोटाची मागणी केलीपुढे त्यांचा घटस्फोट झाला.

आता यात नक्की काय घडले?
मुलगा अत्यंत स्वाभिमानी होता.. त्याने त्याचं करिअर स्वतःच्या हिमतीवर बनवले होतेतर मुलगी अत्यंत लाडात वाढवली होतीपुढे समुपदेशनात लक्षात आले की मुलगी एकुलती एक.. लहानपणी मुलगी ज्या दुकानाच्या बाहेर उभी राहील त्या दुकानातल्या वस्तू गरज नसताना तिचे पालक विकत घेत असायचे. "काय हवं माझ्या सोनुलीला?" बार्बी गर्ल.. ओके.. लगेच तिला ती बाहुली मिळत गेलीतोंडामधून एखादी मागणी आली की ती लगेच हट्ट म्हणून पुरवली जायचीया पद्धतीने ती लहानाची मोठी झाली आणि लग्न झाल्यावर वर्षभराच्या आत ती माहेरी आली.

पालकांनो लहान मुलांचे मानसिक स्वास्थ आणि भावनिक स्वास्थ हे तुम्ही त्याच्याशी कसे लहानपणी वागतात त्यावर अवलंबून असतेपालक मुलांचे लाड करण्याच्या नादात कुठे थांबायचे ते सुद्धा विसरतातमागितलं की मिळतं ही सवय जर मुलांना लागली की पुढे हे जड जाते.
अश्या मुलांना वाईट सवयी लवकर लागतात आणि मुली लवकर बिघडतातनकाराची सवय राहिली नाही तर मोठ्यापणी साधा प्रेम भंग सुद्धा पचवता येत नाही ना ऑफीसमध्ये बॉस शी जुळवून घेता येतंयाचं कारण पालक मुला-मुलींचा त्यांचा प्रत्येक प्रश्न स्वतः सोडवण्याच्या भानगडीत पडतातकॉलनीत मुला मुलांचे भांडण झाले तर लगेच शेजाऱ्यांशी भांडायला आई जातेशाळेत थोडं टीचर रागवली की बाबा लगेच मुख्याध्यापकांना जाब विचारायला भेटतातस्नेहसंमेलन वेळेस मुलाला डान्स मधून काढलं आणि दुसरा डान्स अथवा दुसऱ्या परफॉर्मस मध्ये टाकले तर लगेच टीचर ला फोन करून जाब विचारतात..
या सर्वांमधून मुलांना आयती उत्तरे मिळतातसर्वात महत्वाचे नकार पचवून घ्यायची सवय लागत नाही.

पालक जेव्हा गरज नसताना पाल्याचा हट्ट पुरवतातपैसे नसताना सुद्धा मुलांचे फाजील लाड पूर्ण करतात आणि त्यांला गोंड शब्दाची झालंर देतात.. ती झालंर म्हणजे, "आमचे लहानपणी असे काही मिळाले नाहीमला जे मिळालं नाही ते मी माझ्या मुलाला मुलीला देईलआणि या कृतीला पालक प्रेम करणं असे म्हणतात.

खरं तर प्रेम आणि काळजी याचा समतोल साधायचा असतो कारण दोन्ही जास्त झालं की वाढ खुंटण्याची भीती असतेमागणी आणि पुरवठा यांचा योग्य समतोल पालक आणि पाल्य मध्ये होणे गरजेचे असतेआपण मुलांशी लहानपणी कसे वागतो त्यावर भविष्यातील त्यांची वर्तणूक ठरत असते.

अति लाडनको ते हट्ट मुलांना आयुष्यातील अतिशय वेगळ्या वळणावर नेऊन ठेवतातआजकालच्या मुलांना अपयश पचवणं शिकवण अत्यंत गरजेचे आहेअपयश पचवायला शिकवण्यासाठी मुलांना काही गोष्टींना जाणीवपूर्वक नाही म्हणणं आवश्यक आहेनाही ऐकण्याची सवय मुलांना शिकवणं हे आजकालच्या पालकांसाठी मोठे आव्हान आहे.
त्यासाठी पालकांनो शाळेतील शिक्षकांची मदत घ्यासर्वात महत्त्वाचं शिक्षकांवर विश्वास ठेवा.. शिक्षकांनी मुलांना केलेली छोटी मोठी शिक्षा त्यांना भोगू द्याआपल्या लहानपणी आपले शिक्षक आपल्याशी कसे वागत होते ते आठवा आणि समंजस विचार कराकारण उमलणाऱ्या रोपट्याला अति पाणीअति सूर्यप्रकाशअति खत हे दिले तर रोपटं कोमेजून जातेत्यामुळे योग्य खत पाणी घालायला शिका.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक





1 comment:

Ganesh Patil said...

अगदी बरोबर, सहमत..!

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...