Friday, 20 September 2019

सिंगल पॅरेंटिंग

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

सिंगल पॅरेंटिंग म्हणजे मुल ऐकतर आईजवळ असते किंवा वडिलांकडे.. पती-पत्नीचे जेव्हा घटस्फोट होतात किंवा दोघांपैकी एका कोणाचा अचानक मृत्यू होतो तेव्हा मुलांची जबाबदारी कोणा एकाकडे येते आणि प्रवास सुरू होतो सिंगल पॅरेंटिंगचा..

यात वेगवेगळे सिच्युएशन आहे.. जसे वडिलांनी मुलांची संपूर्ण जबाबदारी घेणे, आईने मुलांची संपूर्ण जबाबदारी घेणे, काही केस मध्ये जबाबदारी वाटून घेणे.. जसे वडील मुलांची शाळेची फी भरेल आणि आई संगोपन करेल. प्रत्येक सिच्युएशन वेगवेगळ्या लेखांमध्ये आपण खोलात जाऊन पाहणार आहोत. आज मला चर्चा करायची आहे ती घटस्फोटा मुळे वेगळे झालेले आई बाबा आणि मुलांची जबाबदारी जेव्हा ऐकट्या आईकडे येते तेव्हा त्या आईचे सिंगल पेंटिंग कसे हवे?

बरेच मॅरेज कौन्सिलर तथा वैवाहिक तज्ञ एक महत्त्वाचा सल्ला लग्नाआधी मुलींना देत असतात की, लग्न झाल्यानंतर पहिले तीन वर्षे तरी बाळाचे नियोजन करू नका. कारण या पहिल्या तीन वर्षातच लग्न रुजवावं लागतं, फुलवावं लागतं.. या तीन वर्षांमध्ये लग्न टिकलं तर पुढे लग्न अधिक उत्तम राहण्याचे चान्ससेस अधिक असतात.

होतं काय समजा पहिल्या एक-दोन वर्षातच पती-पत्नीचे खटके उडायला लागले तर बरेच जण सल्ला देतात की बाळाला जन्म द्या सर्व ठीक होईल.. पत्नी त्या पद्धतीने विचार करते आणि बाळाला जन्म देते पण बऱ्याच केसेस मध्ये लग्न अधिक बिघडते कारण वादाची कारणे वेगळी असतात आणि चार-पाच वर्षांमध्ये घटस्फोट होतो. आता या प्रकरणात जन्मलेल्या बाळाचा काही दोष नसतो. पहिल्या सहा वर्षाच्या आत लहान मुलांनी आई वडिलांचे फक्त भांडणच पाहिले असेल तर अशी मुलं मोठ्यापणी भावनिकदृष्ट्या समस्याग्रस्त बनतात.

त्यामुळे जर पती पत्नीचे पटत नसेल पण "फक्त मुलांसाठी एकत्र राहतो.." "रोज भांडू पण मुलांसाठी घटस्फोट घेणार नाही".. अशा प्रकरणात घटस्पोटा पेक्षा जास्त नुकसान लहान मुलांच्या मानसिकतेवर होते. त्यापेक्षा घटस्फोट घेतलेला कधीही योग्य. आता आई मुलाची काळजी घेते, कायदेशीर कस्टडी सुद्धा आईकडे असेल अशा केसमध्ये सिंगल पॅरेंटिंग कसे हवे?

१) पहिले तर आईने घटस्फोटामुळे जर कुठली अपराधीपणाची भावना मनात घर करून बसली असेल तर त्याने ती काढून टाकावी सर्वांना आनंदी राहण्याचा अधिकार असतो बराच आयांना घटस्फोटानंतर नरेश यांमध्ये जातात आणि त्याचा कळत-नकळत परिणाम लहान मुलांवर होतो

२) मुलांना वाढवताना "मी बिचारी आई", "मी एक अबला नारी" "मी एकटी काय करू", असे चुकीचे वाक्य मुलान देखत काढू नये. सिंगल पॅरेंटिंग मुळे त्यांचे भावविश्व आधीच अस्वस्थ असते. आईने हतबलता दाखवली तर हे मुलं अधिक कोमजले जातात.

३) सिंगल पॅरेंटिंग मधे आईने मुलाला भरपूर वेळ दिला पाहिजे यामध्ये भरपूर वेळ याचा अर्थ क्वालिटी टाइम मुलांसोबत खर्च करणे. यामध्ये भावनिक आधार प्रधान होणे आवश्यक आहे.

४) सर्वात महत्त्वाचे जर तुमच्या जीवनात भावनिक अस्थिरता चालू असेल तर त्याच्यासमोर तुमचे रोजचे दैनंदिन कामे बंद करून रडत बसू नका. तुमचे डेली रुटीन लाइफ चालू राहू द्या. त्याचे स्वतःचे डेली रुटीन कामेसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. त्याला किंवा तिला सर्व नॉर्मल वाटणे अत्यंत आवश्यक आहे.

५) तुमच्या आजूबाजू कडून, जवळच्या व्यक्तीकडून आपल्या मुलांसाठी सपोर्ट सिस्टिम डेव्हलप करा. तुमचे सुद्धा ताण आणि कामाचा भाग हा शेअर होतो. सर्वच तुम्ही एकटे हँडल करू नका. बराच वेळा तुम्ही इगो एवढा मोठा करता की मी माझ्या मुलाला-मुलीला मी एकटेच सांभाळू शकते हे दुसऱ्यांना खास करून सासरच्या लोकांना दाखवण्याच्या नादात तुम्ही खूप जबाबदारी स्वीकारतात. त्यात नोकरी असते त्याचा वेळा आणि मुलांच्या वेळा.. शाळेच्या वेळा.. त्यांचा क्लास.. त्याच्या ने आण करण्याच्या वेळा यामध्ये तुमची तारांबळ उडते. त्यापेक्षा तुम्ही जवळचे मित्र नातेवाईक यांची मदत घेणे कधीही उत्तम.

६) सिंगल पेंटिंगमध्ये शिस्तीला तेवढेच महत्त्व आहे. मुलं, वडील नाही म्हणून सर्व हट्ट तुमच्याकडे मागणी करतात. काही जण तर तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात. अशा वेळेस मी एकटी आहे म्हणून त्याचे तिचे सर्व लाड पूर्ण करणे हे योग्य नाही. अशाने मुलं डिमांडिंग बनतात.

७) तुम्ही विधायक विचार करा आणि विधायक वागा. सिंगल पॅरेंटिंग मध्ये आई जर खूप जास्त वेळ नैराश्यामध्ये राहिली तर त्याचा परिणाम मुलांच्या वाढीवर होतो. तुम्ही खंबीर राहिलात,आनंदी राहिलात तर मुलांची वाठ अधिक निकोप आणि चांगली होते. तुमचा मूड जसा असेल तसा तुमच्या मुलांचा बनतो. त्यामुळे तुम्ही आनंदी, लेट गो अटीट्युड ठेवणे आवश्यक आहे.

८) मुलांच्या वयानुसार त्याला तुमच्या पती-पत्नीच्या नात्याबद्दल सांगायला काही हरकत नाही. खरं आणि प्रामाणिकपणे सांगा. सर्वच गोष्टी सांगणे आवश्यक नाही पण महत्त्वाचे मुद्दे सांगू शकता. खूप एक्सप्लेनेशन न देता दोन तीन महत्वाचे मुद्दे सांगा. खास करून जर तुमची मुलं चार ते आठ वर्षांमधील असेल तर त्यांना सांगा आता बाबा किंवा तुम्ही वेगळे घर घेणार आहे.. तिथे आपण राहू ..बाबा आपल्या सोबत नसणार आहे.. यावेळेस तुम्ही चांगल्या भविष्याचे चित्र रंगवा. ते तुमच्या मुलांना जरूर सांगा.

९) तुमच्या ओळखीतल्या सिंगल पॅरेंटिंग मॉम यांची ओळख करून घ्या. सिंगल पॅरेंटिंग चा कुठला ग्रुप आहे का ते शोधा.. याने खूपच मदत होत असते.

१०) "लोक काय म्हणतील", याकडे संपूर्ण दुर्लक्ष करा. लोक गेले खड्ड्यात.. तुम्हाला जे योग्य वाटते, तुमच्या सदसद्विवेक बुद्धीला जे पटते, तेच करा.. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याचा परिणाम तुमच्या मनावर, कामावर व निर्णयावर होऊ देऊ नका. सिंगल पॅरेंटिंग मध्ये आई कुठे पब्लिक फंक्शन ला गेली.. कुठे नातेवाईकांच्या कुठल्या कार्यक्रमाला गेली तर तिला वाटते की सर्वजण आपल्या बद्दलच बोलत असतील. हा तुमचा वहम असतो. कारण ते लोक खूप बिझी आहेत हा विचार करण्यात की तुम्ही त्यांच्या बद्दल काय विचार करतात. काहीजण तुम्हाला सॉरी फिलिंग अटीट्युड देतील तर काहीजण तुम्हाला दोष देतील की तुला नवरा सांभाळता आला नाही.. अशा दोन्ही लोकांपासून दूर राहा किंवा ते काय बोलतात त्याचा परिणाम स्वतःवर अजिबात होऊ देऊ नका. या संपूर्ण प्रोसेसमध्ये तुमचा आत्मविश्वास फार महत्वाचा. तुमच्यातील आत्मविश्वास आणि हिम्मतच तुमच्या मुला-मुलींना वाढवण्याची काठी आहे.

सिंगल पॅरेंटिंग हे चॅलेंज म्हणून न घेता एक आनंदी पालकत्व म्हणून घ्या. घटस्फोट होणे म्हणजे काही फार मोठं आयुष्यात चुकीचं झालं आहे हे असं अजिबात नसतं. तुम्ही मुलांना देखत आपलं बालपण एन्जॉय करा..

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

The Empty Classroom: India's Silent Education Emergency

Article by Sachin Usha Vilas Joshi India has made remarkable strides in expanding access to education—almost every village has a primary sch...