Friday, 4 October 2019

पालकत्वाचे प्रमुख आव्हाने


शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

प्रत्येक शतकाचे काहीना काही आव्हाने असतात. त्या शतकातील प्रत्येक क्षेत्राचे पुन्हा स्वतंत्र आव्हाने असतात. मग ते क्षेत्र परेटिंग असो का कुटुंबाचे का पती-पत्नींचे.. प्रत्येकाचे काही अडचणी तथा अव्हानं असतात.

आज आपण पालकत्वाचे काय महत्वाचे आव्हाने आहेत जे प्रत्येक आईवडील त्यांच्या पाल्याला वाढवताना त्याना सामोरे जावेच लागते ते बघूया. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती.. तेव्हा सुद्धा त्यांचे काही आव्हाने ही होतीच.. पण माहितीचे आदान-प्रदान करणारे मिडीया नसल्याने ते आपल्याला ठळकपणे समजून येत नव्हते. एकविसाव्या शतकातील आज कालच्या आई-वडिलांना कुठल्या आव्हानांना तोंड द्यावे लागते?

१) मुलांना पैशाचे महत्व कसे समजावून द्यायचे?
आपली जी पिढी आहे म्हणजेच जी आता 30 ते 40 वयाची झाली आहे त्यांना मी अँटिक पिढी म्हणेल कारण या पिढीने संगणक बनण्यापासून, फ्लॉपी ते पेन ड्राईव्ह, टेपरेकॉर्डर ते म्युझिक ॲप.. असा सर्व प्रवास पाहिला आहे. आपल्याला लहानपणी प्रत्येक गोष्ट जपून वापरायची शिकवली. नवीन कपडे फक्त दिवाळीलाच.. त्यातील दोन्ही भावांना एकच शर्टपीस.. अशा पद्धतीने आपली वाढ झाली. कुठलीही नवीन गोष्ट वडिलांकडे मागायला दहावेळा विचार करणारी आपली पिढी, आज आपले मुलं जे पहिलीपासून ते कॉलेज पर्यंत वयाचे आहे त्यांना पैशाची मुळीच किंमत नाही असे प्रत्येक आई-वडिलांना वाटते.

कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर हे मुलं म्हणतात, "बाबा एटीएम मधून पैसे काढ किंवा ऑनलाईन ट्रान्सफर कर.." जेव्हा आपण म्हणतो की, 'अरे पैसे कमवायला खूप मेहनत लागते" तर ते म्हणतात.. 'काय मेहनत लागते एटीएम मधून तर काढायचे असतात". त्याना हेच माहिती नाही आहे की एटीएम मध्ये पैसे जातात कसे?. कुठलीही गोष्ट विकत आणली की तेवढ्यापुरते त्याचे कौतुक असते नंतर त्याचा वापर शून्य. 'मागितले की मिळते", अशी सवय आपण लावून दिल्याने त्यांना पैशाचे महत्त्व राहिले नाही. जैन समाज, मारवाडी समाज, गुजराती समाज याबाबत मुलांना चांगली शिकवण देत असतो पण आजकाल याही समाजातील मुलं "मागितले की मिळालेच पाहिजे" या मानसिकतेची होत चालले आहे. आजकालची मुलं लगेच तुलनेच्या मूडमध्ये जातात. "माझ्या मित्राचे बाबा त्याला हे आणून देतात ते आणतात..तुम्ही काहीच आणून देत नाही.." मुलं आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करत असतात. या आव्हानाला तोंड कसं द्यायचं यावर सविस्तर घरात चर्चा होणे आवश्यक आहे. पण मुलांना आर्थिक साक्षरता चे धडे वयाच्या 10 वर्षापासून सुरुवात करणे आवश्यक झाले आहे.

२) दुसरे आव्हान आहे ते म्हणजे प्रत्येक आई-वडिलांना वाटते की माझा मुलगा किंवा मुलगी जिल्ह्यामध्ये पहिली यावी.. नाही जिल्ह्यात तर शहरांमध्ये.. नाही शहरांमध्ये तर कॉलनीमध्ये.. नाही कॉलनीमध्ये तर शाळेमध्ये.. नाही शाळेत तर वर्गामध्ये... नाही वर्गात पहिल्या पाच मध्ये.. तर पहिल्या दहा मध्ये... ती किंवा तो असायलाच हवा.

पहिल्या येण्याची जी स्पर्धा लागली असते की आपला मुलाला घोडा समजून आई वडील घोडेस्वारी करत असतात. मग समजा मुलगा किंवा मुलगी अभ्यासात पहिल्या दहामध्ये येत नसेल तर संगीत, खेळ, कला कशात तरी त्याचे नाव नोंदवायचे आणि त्यामध्ये पहिल्या दहात कसा येईल याची स्पर्धा चालू करायची.

आता हे आई-वडिलांना समजत असते की अशी स्पर्धा करणे चुकीचे आहे.. त्यातून ताण निर्माण होतो.. तरीसुद्धा ते या चक्रामध्ये अडकतात कारण आजूबाजूची परिस्थिती. आज-काल एज्युकेशन मार्केट मधून सातत्याने या ना त्या परीक्षा, स्कॉलरशिप, स्पर्धा, ओलंपियाड यासारखे इव्हेंट कार्यक्रम होत असतात. पालकांच्या पहिल्या येणाऱ्या हट्टा पाई खाजगी ओलंपियाड परीक्षेचा करोडो रुपयाची मोठी एक्झाम इंडस्ट्री झाली आहे. ते इतके हुशार असतात की वर्गात पहिल्या आणण्यापासून ते जगात पहिल्या चे बक्षीस अर्थात सर्टिफिकेट काढतात. जेणेकरून प्रत्येक सहभागी पालक खुश होतील.

या सर्व हट्टापायी कळत-नकळत मुलांवर ताण येतो. माझा मुलगा कधीच कुठल्या गोष्टीत पहिला येत नाही यात सुद्धा सुख असतं हे आपण विसरत चाललोय. आपण लहानपणी कधी पहिला दहा मध्ये आलेलो नाही पण आपण नेहमी विविध गोष्टी करुन बघितल्या त्यामुळे सहभागातला आनंद हा नेहमीच आपल्या पिढीला मिळाला. तो आपल्या मुलांनाही आता द्यायला हवा.

३) सोशल मीडियाचे आव्हान
हे माहिती आदान-प्रदानाचे युग आहे. या इन्फॉर्मेशन वर्ड मध्ये चारही बाजूने माहिती मिळत असते. ही माहिती खरी की खोटी याचा काही पत्ता नसतो. त्यात फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल साइटवर आजकालची मुलं आणि पालक दोघेही सारखेच अडकलेले आहे. सोशल मीडिया मुलांचा आणि पालकांचा त्यांच्या एकूण ऐकत्र राहण्याच्या वेळे मधला ऐंशी टक्के वेळ घेत असतो.

मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे. टीव्ही, युट्युब वर मुलं अडकली आहे. मुलं टीव्ही मध्ये अडकली कारण आई बाबाच त्यांना ब्रेक मध्ये भेटतात. टीव्ही, मोबाईल मुळे ग्राउंड ओसाड पडली आहे. ओसाड पडलेली मैदान आता समाज मंदिर, गार्डन असे झाले आहे. मुलांना घराजवळ खेळायला ग्राउंड नाही आणि असली तरी मुलं फुटबॉल मोबाईलवर खेळतात.

मुलं तसेच शिकतात चे बघतात. आई मोबाईलवर इतका वेळ असते की मुलांना वाटतच नाही की आईशी बोलावे, शेअर करावे.. त्यामुळे सोशल मीडिया हाताळण्य एक मोठं आव्हान पालकांना आले आहे.

सचिन वर्षा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...