मला असे वाटते जगामध्ये एकही मूल असे नसेल ज्याला लहानपणी भुताच्या गोष्टी सांगितल्या नसेल. आपल्या बऱ्याच गोष्टींमध्ये भूत हे असतंच आणि येथूनच आपल्या सर्वांच्या मनात भुताचे चित्र रेखाटले जाते.
जगात भूत कुठेच नसते, ते असते आईच्या डोक्यात.. जे डायरेक्ट मुलाच्या डोक्यात टाकले जाते. आपण मोठ झाल्यावर कितीही रॅशनल झालो, शास्त्रीय दृष्टिकोन बाळगला, बौद्धिक पातळीवर भूत नसतं हे पटत जरी असले तरी अंतर्मनात भुताची भीती वाटत जाते... याचे मुख्य कारण म्हणजे लहानपणी चे भूतांचे संस्कार.
आता भूत म्हणजे काय तर आत्म्याच्या कल्पनेतून भूताची निर्मिती झाली असे मानले जाते. जी व्यक्ती मरतांना त्याच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण न करताच मरते तेव्हा त्याचा आत्मा हा अतृप्त राहतो. प्रत्येक अत्रुप्त आत्मा चे रूपांतर भुतांमध्ये होते.. तो आत्मा भटकत असतो.
आता माणूस असा प्राणी आहे की त्याच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही. अर्थशास्त्रामध्ये हे शिकवले आहे की माणूस नेहमी मागणी करत असतो कारण इच्छा या अगणित असतात. आता ज्यांचा इच्छा पूर्ण होत नाही तो/ती भूत बनते. अशी सर्वसाधारण भुताची कल्पना आहे. भूत अमावस्याच्या दिवशी दिसते, रात्री बाराच्या ठोक्याला येते, ते पांढरे कपडे घालते, पाय उलटे असतात, झाडावर बसते, स्मशानभूमीत राहते.. वगैरे वगैरे..
आता मेडिकल सायन्स ने सिद्ध केले आहे की आत्मा नसतो.. जर आत्माच नसेल तर भूत येईल कुठे.. तरी भूत कसे लागते? याचे मूळ लहानपणी आपल्या आईवडिलांनी, शिक्षकांनी, नातेवाईकांनी, टीव्हीने, मित्रांनी ज्या भुताच्या गोष्टी सांगितल्या असतात त्यामध्ये असते. या सर्व गोष्टींमधून भुताची संकल्पना, चित्र अंतर्मनात घट्ट बसते. जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा "सूचना" च्या सामर्थ्याने आपल्याला भूत लागू शकते.
लहानपणी पहिल्या आठ वर्षापर्यंत आपण या वयात जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवत असतो. या वयात सर्व मोठ्या लोकांनी दिलेल्या "सजेशन' मेंदूमध्ये कायमचे बसते. लहान वयातच आपल्या कानावर भूत हे असतेच..
ते अमावस्या ला येते.. ते पांढऱ्या रंगाचे असते.. त्याचा आकार चित्रविचित्र असतो.. अशा प्रकारे एक इमेज आपल्या मेंदूमध्ये दिली जाते. मेंदूला जे कंडिशनिंग केले जाते त्याचप्रमाणे आपण वागत असतो. आपण आपल्या मनात भुताची एक काल्पनिक चित्र व त्याची बॉडी लँग्वेज करून ठेवतो व हे मानसिक चित्र / कंडिशन जन्मभर आपल्या मनात घर करुन राहत असते.
पालकांनो लक्षात राहू द्या, आपला मेंदू कॉम्प्युटर सारखा काम करतो. जे इनपुट द्याल तेच आउटपुट मिळते. आता ज्यावेळेस आपल्या भावना टोकाला पोहोचतात तेव्हा मेंदू काम करत नाही व स्वतः जी सुचना देईल तेच खरं वाटतं. जेव्हा आपण प्रचंड घाबरत असतो तेव्हा मेंदूतील भावना टोकाला पोहोचतात व स्वतः सूचना देऊन आपल्याला भूत लागते किंवा भूत दिसते. भूत कसं असतं आणि भूत लागण्याचे सर्व लक्षणे लहानपणी विविध गोष्टींमधून.. टीव्ही मधून.. आई-वडिलांच्या गप्पातून मनात आधीच पेरलेले असते.. त्यामुळे भावना टोकाला गेल्यावर स्वयम् सूचनेने भूत लागते.
त्यामुळे भारतीय पालकांनी मुलांना लहानपणी गोष्टी सांगताना शक्यतो भुताच्या गोष्टी टाळाव्या. भुता वरील टीव्ही मालिका मुळीच दाखवू नये. जी गोष्ट अस्तित्वात नाही त्याचे चुकीचे संस्कार मुलांच्या कोवळ्या मनावर टाकून तो / ती मोठी झाल्यावर 'भुताला घाबरणारी व्यक्ती' बनते. आता भूत अंधारातच दिसते असे बिंबवले गेले असल्याने तो / ती ही प्रचंड अंधाराला घाबरते. म्हणूनच १०० लोकांमध्ये किमान ८० लोकांना अंधाराची भीती वाटते. याचे मूळ लहानपणी सांगितलेल्या अशास्त्रीय
गोष्टींमध्ये असते.
आता तुम्ही म्हणाल पालक म्हणून आम्ही अशा
भुता-खेताच्या गोष्टी सांगत नाही. पण मुलं त्यांच्या मित्रांकडून टीव्ही मधून
ऐकतात.. अशा वेळेस त्यांचे तुम्ही समुपदेशन करा. टीव्हीवर असे काही दृश्य आले तर
त्यावर गप्पा मारा. त्यांना सांगा हे सर्व खरं नसतं.. हे शूटिंग आहे. जमल्यास शूटिंग
कसे करतात ते त्याला प्रत्यक्ष दाखवा किंवा युट्युब वर दाखवू शकतात. अधून मधून
तुमच्या गप्पांमधून सातत्याने येऊ द्या की, "भुत वगैरे काही नसते", त्या
अंधश्रद्धा आहे.. या गोष्टी वडिलांनी आवर्जून आपल्या पाल्याला सांगावे.
मूल जर मोठा असेल म्हणजे पाचवी सहावी इयत्ते
मध्ये असेल तर त्यांना यावर चांगली व्याख्यान ऐकवा. युट्युब वर श्याम मानव यांची
भूतावरील व्याख्याने ऐकण्यासारखे आहे. इस्पॅलियर एक्सपिरिमेन्टल स्कूलच्या नववी
च्या ३० विद्यार्थ्यांनी स्मशानभूमी व कबरीस्थान येथे अमावस्याच्या दिवशी रात्री
बारा वाजता जाऊन प्रत्यक्ष भूत असते की नाही याची पाहणी केली होती, त्याचे सुद्धा
व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध आहे. ते विडिओ मुलांना दाखवा. सांगायचा मुख्य मुद्दा हा
की बालमनावर भुताच्या गोष्टीचा परिणाम खूप होतो म्हणून लहानपणी या गोष्टी सांगू नये.
उलट भूत वगैरे नसते यासंदर्भातल्या गोष्टी मुलांना ऐकवा दाखवा.
इथे मी नमूद करतो की मुलांना भरपूर गोष्टी सांगा
पण भुताच्या गोष्टी सांगू नका. चांगल्या गोष्टीनें संस्कार आणि कल्पनाशक्तीची वाढ
होत असते. नकारात्मक गोष्टींनी ही वाढ खुंटते.
No comments:
Post a Comment