'आळशी पालक", हो हा लेख मी आळशी पालकांवर लिहितोय. तुम्ही म्हणाल, पालकांना आळशी का म्हणताय? उत्तर सोपे आहे.. ज्या सहजतेने आपण मुलांना 'ए आळशी' हे लेबल लावतो तसेच काही..
आळशी पालक म्हणजे कोण? तर असे पालक जे समजतात की मुलही आपोआप मोठी होत असतात किंवा त्यांच्या विकासात आईबाबांची भूमिका असली काय आणि नसली काय... त्याचे फायदे-तोटे त्यांना कळतच नसतात..
भूमिका याचा अर्थ मुलांना वाढवताना फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न..
जे बाबा संध्याकाळी ऑफिस वरून आल्यानंतर अभ्यास केला का? आणि जेवण केलं का? हे एवढेच प्रश्न विचारतात.. हे विचारले म्हणजे मुलांशी संवाद साधला अशी समज असते.. आणि रविवारी एखाद्या मॉल ला घेऊन जाणे, जमले तर एक पिक्चर दाखवणे आणि ठरलेल्या हॉटेलमध्ये ठरले पदार्थ ऑर्डर करून हॉटेलिंग करणे म्हणजे आपली या आठवड्याची जबाबदारी संपली अशांना अशी बाबा म्हटले पाहिजे.
जी आई संध्याकाळी मुलांच्या आयुष्यातला प्राईम टाईम सोडून टीव्ही समोरील प्राईम टाईमला सास-बहूच्या सिरीयल पाहते.. सिरीयल पाहता पाहता मुलांना आतल्या खोलीत अभ्यास करण्याचा फतवा काढते.. जी आई मुलाला कुठला क्लास लावायचा असेल तर पहिले जवळ कुठे क्लास आहे याचा तपास करते आणि कमीत कमी कष्ट पडतील अशा जवळचा क्लास लावते.. भले तो किंवा ती क्लास शिक्षकांचा दर्जा काही असो..
मुलांना वेळेवर जेवण खायला देणे व त्यासाठी आटापिटा करणे आणि सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अभ्यास कर अभ्यास कर असे म्हणत जाणे... (मुला शेजारी बसून त्याच्या अभ्यासातील समस्या शोधणार नाही) अशा आईंना आळशी आई म्हटले जाते..
खरं तर मुलांना वाढवताना LOVE चे स्पेलिंग L,O,V,E काढून T,I,M,E करणे आवश्यक आहे. मुलांना वाढवताना आई-वडील किती वेळ देता यापेक्षा कसा वेळ देता हे खूप महत्त्वाचे.. त्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारा..
आपल्या बोलण्यातून मुलांचे कुतूहल वाढते का? त्यांना प्रोत्साहन मिळते का?
आपल्या संगती मध्ये त्यांना विविध अनुभव मिळता आहे का?
आपल्या वागण्यातून ते प्रेरित होतात का?
आपण त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा ते आपल्याला विविध प्रश्न विचारून त्यांची कुतुहलाची तहान भागवतात का? आपल्या मुलाला एखादा कलेमध्ये पारंगत करायचे असेल तर शहरातील उत्तम शिक्षकांची आपण निवड करता का? दर आठवड्याला त्याला एक तरी आगळावेगळा कृतिशील अनुभव मिळेल असे नियोजन करता का? त्याच्या सोबत बसून त्याच्या अभ्यासाच्या समस्या समजून घेऊन त्याच्या शाळेतील शिक्षकांची योग्य संवाद साधून त्याला मदत करता का?
त्याला किंवा तिला अधून मधून गोष्ट स्वतः सांगता का? त्याची अभिव्यक्ती व्यक्त होण्यासाठी मुक्त चित्र त्याला काढू देतात का?..
त्याच्या किंवा तिच्या सोबत मनसोक्त खेळतात का?
तो किंवा ती आपल्याशी बोलत असेल तेव्हा आपण आपला मोबाईल बाजूला ठेवतात का?
आपल्या छोट्या मोठ्या निर्णयात आपल्या पाल्याला सामील करून घेतात का?
मुलानं देखत आपल्या जोडीदाराबरोबर प्रेमाने वागता का?
ऑफिस वरून घरी आल्यानंतर तुम्ही उत्साही आनंदी शांत असतात का?
..हे आणि असे असंख्य प्रश्नांची उत्तर जर हो येत असेल तर तुमचं पालकत्व योग्य दिशेने चालू आहे आणि जर उत्तर नाही येत असेल तर तुम्हाला सुद्धा आळशी पालकांचा शिक्का लागू शकतो.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

No comments:
Post a Comment