शाळा बाह्य मुलं शोधण्याची अभिनव कल्पना
मुलं शाळेत जाऊन निरक्षर रहातात हे विविध अहवालानुसार सिध्द झाले आहे. असर चा अहवाल सांगतो ४०% विद्यार्थ्यांना हातच्याची वजाबाकी येत नाही. ५०% विद्यार्थ्यांना साधा परीच्छेद वाचता येत नाही, ही जर शिक्षणाची स्थिती असेल तर विद्यार्थी शाळेत शिकता की नाही हा प्रश्न उपस्थित होतो. याची कारणे काय व त्यावर काय उपाय करता येतील या विचारात मी होतो.
कोठारी आयोगाचे प्रसिध्द वाक्ये आहे की, भारताचे भवितव्य आज शाळेतील वर्गामध्ये घडते. पण विद्यार्थी संख्या येव्हढी आहे की सर्वच विद्यार्थी शाळेत आणू शकणार नाही. तेवढ्या शाळा उपलब्ध नाही. आजही इयत्ता ८ वी पुढे ३२००० शाळांची गरज आहे. पुन्हा प्रश्न निर्माण झाला की यावर उपाय काय?
महाराष्ट्रात शाळा मध्येच सोडण्याचे प्रमाण खूप आहे. समजा १लीला १०० विद्यार्थी शिकत असतील तर १२ वी पर्यंत १३ ते १४ विद्यार्थीच पोहचतात बाकी सर्व गळती घेतात. गळतीचे प्रमाणे कमी कसे करता येईल यावर सुुध्दा मी विविध मान्यवरांशी चर्चा केली. त्यातुन मला अजुन शिक्षणाचे भयान चित्र समजले. सरकारी शाळामधील वास्तव हे चिंताजणक आहे हे कळले.
शाळेतून गळतीचे प्रमाण अधिक आहे. शाळाबाह्य होण्याची कारणे खूप आहेत, भावंड्ये सांभाळणे, धुणी-भांडी करणे, स्ंथलांतर होणे, घर सांभाळणे अशी असंख्य कारणे आहेत. त्यातील शाळाबाह्य मुलींचे प्रमाण अधिक. त्यांच्याबरोबर शिक्षकाने मारणे, शिक्षकांची उदासिनता, शाळातील सोयी-सुविधांचा अभाव, जसे पावसात वर्ग गळणे, अंधार्या खोल्या आजही ५०% शाळांमध्ये व्यवस्थित स्वच्छतागृहे नाहीत. परंतु शाळाबाह्य आणि विद्यार्थी गळतीचे महत्वाचे कारण आहे, ते म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी वाटत नाही.
राष्ट्रीय नमुना पाहणी (एन.एस.एस), च्या ४६च्या सर्व्हेक्षणात असे आढळून आले की, शाळेत रस नसणे. हे मुलांच्या गळतीचे प्रमुख कारण आहे. एन.सी.ई.आर.टीने ‘स्कूल इफेक्टिवनेस अॅन्ड लर्निंग अॅचिव्हमेंट अॅट प्रायमरी स्टेज या विषयावर आंतरराष्ट्रीय परीषद आयोजीत केली होती. त्यामध्ये मुलांच्या शाळेतील गळतीची प्रमुख कारणे सांगितली ती अशी. १) चुकीच्या मार्गाने होत असलेले सामाजिकीकरण २) जागृतीचा अभाव ३) शाळेतील अपुर्या सोयी-सुविधा ४) पालकांना समजविण्याचे अपुरे प्रयत्न या चारही कारणांवर काय उपाय शोधता येतील आणि जास्तीत जास्त मुले शाळेत कसे टिकतील यावर मला काय खारीचा वाटा उचलता येईल या विचारात मी होतो.
शिक्षणात अमुलाग्र बदल हवा पण हा बदल फक्त शिकविण्याच्या पध्दतीत नसून शिक्षकांच्या मानसिकतेेत हवा. प्रचंड मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे लागेल. पण सरकार शिक्षणावर अतिशय कमी म्हणजे सात ते आठ टक्के खर्च करते. सोनगेल सारखा अत्यंत गरीब देश एकूण उत्पनाच्या ४०% खर्च शिक्षणावर खर्च करतो. खाजगी गुंतवणुक शिक्षण क्षेत्रात येतात पण त्यांना नफ्याची गणिते हवी असतात. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना सरकारी शाळेवर अवलंबून राहावे लागते. एक शाळा बांधायला जागा, इमारत, शिक्षण साहीत्य याचा खर्च शहरी भागात १० ते १२ कोटी लागतात आणि ग्रामिण भागात ५ ते ६ कोटी, एवढा खर्च करायला कोणी तयार होत नाही.
यासर्वांवर काय उत्तर शोधता येईल. या विचारात होतो म्हणजे विद्यार्थी रोज उठून शाळेत जायाला हवे. त्यांचे गळतीचे प्रमाण ० % व्हावे, त्यांना त्यंाच्या इयत्तेतील अभ्यासक्रम जमला पाहीजे. त्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी. या सर्वांच्या विचारात असतांना मला स्वामी विवेकानंदाचे एक वाक्ये वाचण्यात आले. खष िेेी लेू लरप पेीं लेाश ींे शर्वीलरींळेप, ींहरप शर्वीलरींळेप सेशी ींे हळा.
जर गरीब विद्यार्थी शिक्षणापर्यंत पोहचत नसेल तर शिक्षणाने त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. मी माझ्या पध्दतीने याचा अर्थ असा काढला की ‘जर गरीब विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसेल तर शाळेनेच गरीब विद्यार्थ्यांकडे पोहचले पाहीजे.’ यातुन माझ्या मनात एक कल्पना जन्माला आली की, आपण फिरती शाळा बनवावी... मोबाईल स्कूल.. चाकांवरील शाळा..
जर गरीब विद्यार्थी शिक्षणापर्यंत पोहचत नसेल तर शिक्षणाने त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. मी माझ्या पध्दतीने याचा अर्थ असा काढला की ‘जर गरीब विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसेल तर शाळेनेच गरीब विद्यार्थ्यांकडे पोहचले पाहीजे.’ यातुन माझ्या मनात एक कल्पना जन्माला आली की, आपण फिरती शाळा बनवावी... मोबाईल स्कूल.. चाकांवरील शाळा..
योगायोगाने त्याच दिवशी घरी स्वदेश सिनेमा बघण्यात आला. त्यात शाहरुख खानची बस बघितली आणि फिरत्या शाळेचे चित्र डोळ्यासमोर येऊ लागले. मी गुगल सर्च केला की कोणीतरी ही आयडीया बनविली असेल ! परदेशात काही ठिकाणी या पध्दतीच्या बसेस दिसल्या पण माझ्या स्वप्नतील तशी नव्हती. मी ठरविले की, आपण एक आगळीवेगळी फिरती शाळा बनवू. जी शिक्षणक्षेत्रात एक प्रयोग म्हणून ओळखली जाईल. शिक्षण क्षेत्रातील समस्सेवर खास करुन वंचित विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ती उत्तर म्हणून काम करेल. ‘कठीण परीस्थीतील’ ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी एक शैक्षणिक प्रयोग करण्याचे निश्चित केले. मी लगेच कामाला लागलो.
मला अशी बस बनवायची होती की, ज्या मध्ये संपूर्ण शाळेचा एक वर्ग बसेल. वर्गात असलेल्या सर्व सोयी-सुविधा त्यामध्ये असतील आणि एका वेळेस ३५ विद्यार्थी आरामात शिक्षण घेऊ शकतील.
झोपडपट्टीतील वंचित विद्यार्थ्यांपर्यंत ही बस जाईल तेथील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, शास्त्र विषय शिकवतील. एक तास एक झोपडपट्टीत शिकवून झाले की, लगेच पुढील वस्ती हे सर्व मनातील विचार मी कागदावर उतरविले व आर्किटेक्ट श्री. शाम लोंढे व बस बॉडी बनविणारे श्री. सॅमसन यांना भेटलो. माझी कल्पना मांडली. वंचित मुलांच्या अडचणी सांगितल्या व मला हव्या असणार्या सोयी-सुविधा सांगितल्या. मला हव्या असलेल्या बसचे चित्र काढले व त्यातुन त्यांनी उत्तम डिझाईन बनविली आणि फिरत्या शाळेची सुरुवात झाली.
टाटा कंपनीची चेसिस् विकत घेवून मी मुंबईला वर्षभर थांबून फिरती शाळा बनविली. आज या बसमध्ये फळा, टिव्ही, सांऊड सिस्टीम, ग्रंथालय, संगणक सर्वकाही आहे. संपूर्ण एक बाजू पारदर्शक काचेची केली आहे. यामागील उद्देश असा की, एखाद्या वस्तीवर बस लावली तर बाहेरील आयांना धुनी भांडी करता करता. बस मधील त्यांचे विद्यार्थी त्यांना दिसतील. जेणे करुन तिला आमच्या बद्दल विश्वास वाटेल. बसला नाव दिले ‘चाकं शिक्षणाची.’ एर्वीलरींळेप ेप थहशशश्र हे त्याचे इंग्रजी रुपातंर.
‘चाकं शिक्षणाची’ प्रकल्पाचा उद्देश हा आहे की, महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारे पण झोपडपट्टीत राहणारे या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल. पहिल्यापासून माझी भूमिका सरकारला मदत करण्याची राहीली. सिस्टीम मध्ये राहून बदल करण्याची भूमिका मी पार पाडली. म्हणून वस्ती वस्तीमध्ये सरकारी शाळेत पाठविण्याची जणजागृती आम्ही केली. आणि संध्याकाळी त्या-त्या वस्ती मध्ये आम्ही या बसच्या माध्यमातून त्यांचे शिक्षणातील शिकवण्याच्या अडचणी सोडवायला लागलोे. वस्तीमध्ये ही बस त्यांच्या दारी उभी करतो. विद्यार्थी बसतो व आमचे शिक्षक गणित, शास्त्र व भाषा विषय शिकवतात. त्यांना लिहायला, वाचायला शिकवतात. हळूहळू त्यांच्यामध्ये शिकण्याची गोडी निर्माण करतात. त्यामुळे वस्तीतील मुले शाळेत जाण्यासाठी कुरकुर करत नाहीत. त्यामुळे दोन वर्षात त्या त्या वस्तीमध्ये शाळा मधेच सोडायचे प्रमाण थांबले. मुले शाळेत जावू लागली. कारण शिक्षणातील अडचणी आम्ही दूर केल्या.
आम्ही या बसमध्ये विविध मान्यवरांना मार्गदर्शक म्हणून बोलवू लागलो. समजाकुणी मार्गदर्शक बसमध्ये झोपडपट्टीत नाही येऊ शकले तर आम्ही या विद्यार्थ्यांना फिरत्या शाळेत बसवतो. आणि शाळाच त्या व्यक्तिच्या दारी नेतो. अशा पध्दतीने वंचीत मुलांना मोठमोठ्या माणसांशी भेटीगाठी झाल्या त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मनात या मोठ्या माणसांसारखे बनण्याचे स्वप्न तरळू लागले. मुले बदलु लागले, अभ्यास आवडू लागला.
आठवी नववीच्या मुलांसाठी शास्त्रातील प्रयोगांचे साहीत्य आणले. प्रयोगशाळा तर बसमध्ये होतीच. विद्यार्थ्यांचे १७ नंबरचे फॉर्म भरुन दहावीत बसविले. दत्तवाडीमधील दहापैकी आठ मुले दहावीत पास झाले. वर्षभर दररोज आम्ही तीन वस्तीमध्ये जायाचो. दरवर्षी नवीन तीन-चार वस्तीमध्ये फिरत्या शाळेचे काम करायचो.
एक संपूर्ण शाळा बनवायला जागा इमारत, बेंचेस लागतात. मी एक फिरता वर्ग बनविला जो विविध ठिकाणी जाऊ शकेल. वंचित मुलांच्या दारी जावून त्यांच्या शिक्षणातील समस्या सोडवेल. ते सुध्दा अगदी विनामुल्य.
‘एज्युकेशन ऑन व्हिल’ या प्रकल्पाची स्थापना मुले शाळेत न जाणार्या बांधकाम मजुरांच्या मुलांना साक्षर करण्यासाठी आली आहे. शिक्षक मुलांपर्यंत घेवून जायाचे मुले जिथे जिथे असतील तेथे शिक्षण पोहचवायचे. मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करायची. त्यांना जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेशकरुन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचे. सकाळी किंवा सायंकाळी विद्यार्थ्यांच्या सोईने बसमध्ये वर्ग भरायचे प्रत्येक वर्ग एक ते दोन तास चालतो. आजू बाजूला काम करणारी रस्त्यावरील झोपडपट्टीतल मुले या वर्गात येऊन बसतात. त्यांच्या अभ्यासातील अडचणी दूर करून बस निघते दुसर्या झोपडपट्टीकडे.
या वस्तीमध्ये काम करतांना लक्षात आले की, खूप तरुण बेकार फिरतात. शिक्षण अर्धवट, व्यसनांच्या आहारी यांना रोजगार मिळण्यासाठी त्यांना काही कौशल्य शिकविले पाहिजे. सरकारच्या यासंदर्भात खूप योजना होत्या. बर्याच एन.जी.ओ. अशा विषयांचे कोर्स चालवायचे. जसे उदबत्ती बनविणे, मेनबत्ती बनविणे, टीव्ही रिपेंरींग पण यांची माहीत वस्तीमध्ये नव्हती. मी नाशिकमधील सर्व संस्था शोधल्या ज्या वंचित मुलांच्या विकासासाठी काम करतात व त्या सर्वांच्या माहीतेचे प्रदर्शन मी बसमध्ये लावले. जवळजवळ तीस संस्था आणि त्यांचे २००हून अधिक व्यावसायिक कोर्स जे एकतर मोफत अथवा अतिशय कमी फिचे होते. ही सर्व माहिती प्रदर्शन बसमध्ये लावून नाशिक मधील सर्व १२७ झोपडपट्टीमध्ये ही फिरती शाळा फिरवली. वर्षभर हा प्रकल्प चालला. रोज एक झोपडपट्टी व तिथे फिरते प्रदर्शन यामुळे झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना स्वंयरोजगाराच्या कोर्सनां प्रवेश मिळाला. व त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
या वस्तीमध्ये काम करतांना लक्षात आले की, खूप तरुण बेकार फिरतात. शिक्षण अर्धवट, व्यसनांच्या आहारी यांना रोजगार मिळण्यासाठी त्यांना काही कौशल्य शिकविले पाहिजे. सरकारच्या यासंदर्भात खूप योजना होत्या. बर्याच एन.जी.ओ. अशा विषयांचे कोर्स चालवायचे. जसे उदबत्ती बनविणे, मेनबत्ती बनविणे, टीव्ही रिपेंरींग पण यांची माहीत वस्तीमध्ये नव्हती. मी नाशिकमधील सर्व संस्था शोधल्या ज्या वंचित मुलांच्या विकासासाठी काम करतात व त्या सर्वांच्या माहीतेचे प्रदर्शन मी बसमध्ये लावले. जवळजवळ तीस संस्था आणि त्यांचे २००हून अधिक व्यावसायिक कोर्स जे एकतर मोफत अथवा अतिशय कमी फिचे होते. ही सर्व माहिती प्रदर्शन बसमध्ये लावून नाशिक मधील सर्व १२७ झोपडपट्टीमध्ये ही फिरती शाळा फिरवली. वर्षभर हा प्रकल्प चालला. रोज एक झोपडपट्टी व तिथे फिरते प्रदर्शन यामुळे झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना स्वंयरोजगाराच्या कोर्सनां प्रवेश मिळाला. व त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
शाळा बाह्य मुलं शोधण्याचा अभिनव उपक्रम
एव्हरी चाईल्ड काऊंट, शाळा बाह्यमुले शोधण्याचा अभिनव उपक्रम.
एव्हरी चाईल्ड काऊंट, शाळा बाह्यमुले शोधण्याचा अभिनव उपक्रम.
गेल्या वर्षापासून मी संपूर्ण भारतभर फिरत असून विविध प्रयोगशील, शैक्षणिक संस्थाना भेटी देऊन त्यावर शैक्षणिक लेख वृत्तपत्रांमध्ये लिहीत आहे. हे करीत असतांना, पुण्यामध्ये डोअर स्टेप या संस्थेचे समन्वय श्री. मंदार शिंदे यांची माझी भेट झाली त्यांनी पुण्यात शाळा बाह्य मुलांसाठी नागरीकांची मदत घेऊन विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणायचे कार्य चालू आहे. त्यातुन मला सुचले की, ही कल्पना आपण फार वेगळ्या पध्दतीने राबवू शकतो.
माझ्या मनात १००हून अधिक विचार येऊ लागले की, आपण संपूर्ण नाशिककरांना कसे यामध्ये सामिलकरून जास्तीत जास्त वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल. डोअर स्टेपच्या संस्थापिका पंराजपे ताई यांच्याकडे याविषयावर अभिनव पध्दतीने माझ्या स्टाईलने काम करण्याची ईच्छा प्रकट केली. त्यांनी मला सहकार्य करुन आशीर्वाद दिला आणि या संकल्पनेला मी नाशिकमध्ये लोक चळवळ (पब्लीक मोव्हमेंट) बनविली.
काय आहे ही संकल्पना. कशी यशस्वी झाली ती पण आपण नीट समजावून घेवू.
आज नाशिकमध्ये १२० हून अधिक झोपडपट्ट्या आहेत त्यामध्ये बरेच विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत या विद्यार्थ्यांना दरवर्षी महाराष्ट्र शासन शोध मोहिम घेते. त्यामध्ये बरेच विद्यार्थी शाळेत आणले जातात पण शासनालाही बंधनेही आहेत.
आज नाशिकमध्ये १२० हून अधिक झोपडपट्ट्या आहेत त्यामध्ये बरेच विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत या विद्यार्थ्यांना दरवर्षी महाराष्ट्र शासन शोध मोहिम घेते. त्यामध्ये बरेच विद्यार्थी शाळेत आणले जातात पण शासनालाही बंधनेही आहेत.
संपूर्ण नाशिककर या वंचीत विद्यार्थ्याचा शोध घेतील ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मला एक सिस्टीम बनवायची होती. सर्व प्रथम मी ८९८३३३५५५५ हा मोबाईल नंबर घेतला आणि सोशल मिडीयाद्वारे काही मित्रांमध्ये लोकांमध्ये आवाहन केले. जर सहा ते आठ वर्षांची शाळेत न जाणारी मुले तुम्हाला दिसली तर आम्हाला ८९८३३३५५५५ या नंबरवर फोन करा आम्ही त्यांना शाळा देवू.
आम्हाला दोनच दिवसात १५ ते २० फोन आले. मी सामाजिक कार्यकर्ते श्री. हेमंत भामरे यांना सोबतीला घेऊन नागरीकांनी जेथे जेथे शाळा बाह्य मुलं आहेत हे सांगितले तेथे आम्ही गेलो. तेथील या वंचित मुलांचे जीवन पाहून माझे मन व्याकुळ झाले काही तरी भरीव काम यामुलांसाठी करावे हे वाटले आणि ‘एव्हरी चाईल्ड काऊंट’ ही संकल्पना जनमानसात आणली.
आम्ही नाशिकरांना सांगावयास लागलो की तुम्हाला रस्त्यावर, गंगेवर, वस्तीमध्ये, दुकानांमध्ये कुठेही सहा ते आठ वर्षाची मुले मुली दिसले की त्यांच्याशी बोला. विचार की तुम्ही शाळेत जाता का? शाळेत जात नसतील तर आम्हाला फोन करा. येथे त्या नागरीकांचे कर्तव्य संपते, आणि आमचे कर्तव्य चालू होते.
आम्ही तेथे जाऊन त्या मुलांच्या आईवडीलांचे समुपदेशन करायचो आणि त्याच्यांसमस्या सोडून जवळच्या महानगरपालिकेत प्रवेश करुन देत होतो.
हा विचार, संकल्पना घरोघरी पोहचविला पाहिजे. म्हणून यांचे प्रसिध्दीपत्र छापू या असे ठरविले. यासाठी आम्ही राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प यांच्याशी संपर्क साधला त्यांनी त्वरीत सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याने आम्ही एक लाख विविध पोस्टर्स, हँडबिल, स्टिकर्स छापले.
आम्हाला हा विचार प्रत्येक वस्तीत (झोपडपट्टीत) न्यायचा होता. म्हणून आम्ही नाशिकरांना विनंती केली की, तुमच्या घरात कामवाली बाई/मावशी येते तिला विचारा की तुमचे मुल शाळेत जाते का? जात नसेल तर फोन करा. आणि जात असेल तर आमचे पोस्टर तुमच्या वस्तीमध्ये लावा. ४,५०० हून अधिक घरगुती कामवाल्या महिलांनी विविध वस्तीमध्ये पोस्टर्स लावले.
सोशल मिडीआद्वारे प्रचंड व्हॅाटस् अॅप फॉरवर्ड झाले. पहिल्या दहा दिवसात २००हून अधिक शाळाबाह्य विद्यार्थी मिळाले. त्वरीत महानगरपालिकेच्या शिक्षणमंडळाकडे जाऊन मार्गदर्शन घेतले. त्यांनी सर्व शाळेचे पत्ते मुख्याध्यापकाचे नांव, फोन नंबर दिले. सर्व शाळांमध्ये ’एव्हरी चाईल्ड कॉऊंटसचे’ पोस्टर्स लावले. सर्व केंद्रपमुख, मुख्याध्यापक यांना सुचना दिल्या की, या संस्थेतुन जे काही विद्यार्थी येतील त्यांना शाळेत प्रवेश द्यावा.
लोकांपर्यंत अधिकप्रभावी पणे पोहचावयाचे होते म्हणून आम्ही विविध हॉटेल मालकांशी संपर्क साधला. दिवट्या बुधल्या, करी लिव्स, रामा हिरीटेज या हॉटेल्सने जेवणाच्या बिलाबरोबर आमचे पत्रक ग्राहकांना दिले.
सर्वांगी पैठणी साडीच्या दुकानदारांनी त्यांच्या ग्राहकांना देण्याच्या बॅगवरच आपला मजकुर छापून दिला. आम्ही विविध इस्त्री व लॉन्ड्रीच्या दुकान मालकांना विनंती केली की, शर्टामध्ये तुम्हाला कागद टाकावा लागतो. तो कागद आमचे पत्रकम्हणून शर्टाच्या घडीत ठेवा. यामुळे आम्ही बर्याच घरामध्ये ही संकल्पना पोहचवू शकलो. आमच्या कार्यात लोकसहभागी होऊ लागले. यासर्व प्रवासात ही संकल्पाना लोकापर्यंत पोहचविण्याच्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला तो म्हणजे सर्व मिडीया पत्रकारांनी सर्व वर्तमान पत्रांमध्ये याविषयी सखोल माहिती प्रसिध्द केली. रेडीओ, एफएम, रेडीओ मिरची यांनी हा विषय लोकांपर्यंत पोहचविला. दिव्यमराठी, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ पेपर्स यांनी हा विषय उचलून धरला.
एकीकडे सोशल मिडीआ न्यूजपेपर व प्रसिध्दी पत्रकाद्वारे नागरीकांना आव्हान चालू होते. तर दुसरीकडे विविध विशेष वस्त्यांमध्ये जाऊन ६ ते ८ वयोगटांतील मुले शोधुन त्यांना शाळेत जाण्याचे महत्त्व पटवून दिले जात होते. काही ठिकाणी महानगरपालिकेची शाळा आहे पण वस्तींमध्ये शिक्षणाचे महत्व नसल्याने मुले शाळेत जात नव्हती. त्या ठिकाणी आम्ही तिथल्या पालकांशी सामुहीक सभा घेऊन शिक्षणाचं शाळेचे महत्त्व समजावून दिले. त्यांना शाळेत प्रवेश घेण्यास तयार केले. त्यासाठी मोठमोठ्या ऑफिसर्स, डॉक्टर्स यांची उदाहरणे दिली. जी कष्टातून, गरीबीतुन, वस्तीतून आली आहेत.
काही वस्त्यांमध्ये बोलीभाषेचा प्रश्न होता म्हणून ते शाळेत जात नव्हते. उदा. गौंड समाजातील फुले नगर येथील गोंडवाडी वस्ती, भराडीवाडी, वडारी, मुस्लिम सैय्यद जाती जमाती मुले मोठ्या प्रमाणावर शिक्षणाबद्दल उदासिन वाटले या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोज संध्याकाळी फिरत्या शाळेच्या माध्यमातून सपोर्ट क्लास चालू केला.
अंबड एम.आय.डी.सी. मधील गौतमनगर वस्तीपासून तीन किलोमिटर अंतरापर्यंत शाळा नाही. शाळेसाठी दूर अंबड गावामध्ये हायवे क्रॉस करावा लागतो. मागिल वर्षी अपघाती मृत्यु झाला म्हणून तेथील पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नव्हते आपण तिथे ११० मुलांसाठी ‘चाकं शिक्षणाची’ बस सुरु केली महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७२ व ७३ मध्ये या सर्व मुलांचा प्रवेश घेण्यात आला. खास दोन व्हॅनची स्कूल ट्रांसपोर्ट म्हणून शिक्षणाची सोय केली.
काही वस्त्यांमध्ये मजूरी करणार्या पालकांचे म्हणने होेते की, शाळेतून मुले घरी आल्यावर त्यांना सांभाळायला कुणी नाही म्हणून आम्ही त्यांना आमच्या सोबत बांधकामाच्या ठिकाणी घेवून जातो. शाळेतून आणावयास व घरी सांभाळावयास कुणी नसल्याने त्यांचे मुलं शाळेपासून वंचित आहेत. जे पालक अदिवासी, निवासी शाळेमध्ये जावून त्यांचे मुलं पाठविण्यास तयार होते. त्यांना आम्ही त्यांच्या जातीप्रमाणे निवासी शाळा शोधून तेथे त्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांचा राहण्याचाही प्रश्न सोडविला.
यासारखे आम्ही बरेच प्रश्न त्यांच्या शिक्षणाबरोबर राहण्याचाही प्रश्न सोडविला. यासारखे आम्ही बरेच प्रश्न सोडविले. एका नागरीकाचा फोन आला माझ्या घरासमोरील रस्त्यावरील एक भिकारी आजी राहते. तिच्या नातवाच्या पायाला मोठी इजा झालेली आहे. या सहा वर्षाच्या मुलाला कोणी नाही. तो चालू शकत नाही. आम्ही लगेच नेल्सन हॉस्पीटलीची मदत घेऊन डॉ. मंदार वैद्य यांनी या मुलांवर मोफत उपचार केले. आम्ही त्यांना निवासी शाळेत पाठवित आहोत. अशा बर्याच अडचणी आल्या आणि आम्ही त्या सोडविल्या.
या अभिनव उपक्रमातून आम्हाला ७०० हून अधिक विद्यार्थ्यांची माहिती मिळाली व त्यांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला. सर्व मुले शाळेमध्ये टिकून राहावीत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
या अभिनव उपक्रमातून आम्हाला ७०० हून अधिक विद्यार्थ्यांची माहिती मिळाली व त्यांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला. सर्व मुले शाळेमध्ये टिकून राहावीत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
एक संपूर्ण शहर शाळा बाह्य विद्यार्थी जेव्हा शोधते तेव्हा त्या शहरातील एकदा आली की मग ते विद्यार्थी शाळेत टिकण्यासाठी काम करावे लागते. आज एव्हरी चाईल्ड कॉऊंटच्या उपक्रमातून नाशिकरांनी ७०० हून अधिक विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणले.
वंचित मुलांना शाळा मिळवून देण्याची ही पब्लीक मोव्हमेंट झाली. वंचित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या अभ्यासातील समस्या दुर करण्यासाठी, अभ्यासात गोडी निर्माण होण्यासाठी, गळती प्रमाण थांबण्यासाठी मी केलेला हा शिक्षणातील प्रयोग आहे. तो सध्या ठरावीक वस्ती पुरता मर्यादित आहे.
नाशिक सारख्या शहराला आजून अशा पाच बस मिळाल्या तर १००-१२५ वस्ती पर्यंत पोहचु शकले. अदीवासी पाड्यांसाठी सुध्दा ही फिरती शाळा वापरता येईल.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
शिक्षण अभ्यासक
No comments:
Post a Comment