तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे? मुले जन्माला आली कि त्यांना शाळेत पाठवावेच लागते. नाहीतर त्याला नोकरी कशी लागेल? तो पैसे कसे कमवेल? मुळातच आपण मुलांना शाळेत का टाकतो याचे समाधानकारक उत्तर बहुतांश पालकांकडे नसते. माणसाचा विकास, व्यक्ती व्यक्तीची प्रगती, जगण्याचा आनंद याचे खरे मूळ असतं त्याला देण्यात येणाऱ्या शिक्षणात. मग स्वतःला प्रश्न विचारा कि, आपण शाळेत होतो तेव्हा टीचर कसा अभ्यास करून घ्यावयाचे? शाळा आपल्याला कसे शिक्षण देत होती? आठवतंय?, 'घोका आणि ओका' आपल्या काळातली शिक्षण पद्धती होती. आता आपली मुलं शाळेत जात आहेत आणि ते सुद्धा 'घोका आणि ओका' या पद्धतीनेच शिकता आहेत. फक्त पाठांतराच्या पद्धतीत सुसंकृतपणा आला आहे. टाय, बूट घालून टच स्क्रीन वर पाठ केलेले परीक्षेच्या दिवशी उतरवतो आणि परीक्षा झाल्या झाल्या विसरून जातात. त्यामुळे आजच्या शिक्षण पद्धती मध्ये आमूलाग्र परिवर्तनाची आवश्यकता आहे.
आपण आजच्या सामाजिक, आर्थिक परिस्थिती नुसार मुलांच्या शिक्षणाचा निर्णय घेतो. पालक त्यांच्या पाल्याला नर्सरी मध्ये प्रवेश घेताना त्याला/तिला डॉक्टर / इंजिनिअर करायचे ठरवूनच शाळेमध्ये प्रवेश घेतात. खरतर विविध शैक्षणिक रिपोर्ट सांगतात सन २०४०/५० मध्ये अधिक सृजनशील, निर्माणक्षम अशी मनुष्यबळाची आवश्यता आहे. जर भारतातील विद्यार्थी आपल्याला सृजनशील, प्रतिभावंत आणि निर्माणक्षम हवे असतील तर आज शाळा शाळा मध्ये जे शिक्षण आणि शैक्षणिक वातावरण आहे, शिक्षणाची जी रचना आहे, ती सर्व बदलली पाहिजे. अधिक प्रतिभावंत व्यक्ती बनण्यासाठी बालकास लहानपणी विविध अनुभव मिळणे हि आवश्यकता असते. लहान वयात विविध गोष्टी करून बघण्याची संधी मिळणे हा निर्णयक्षम चा मूलभूत पाया असतो.
आपल्याला असे शिक्षण द्यायचे कि ज्यातून विद्यार्थ्यांना विविध अनुभव मिळतील. शाळा कॉलेज ने असे काही शैक्षणिक नियोजन करायला हवे कि, त्यामुळे सातत्याने विद्यार्थ्याला त्याच्या रस असलेल्या गोष्टी सादर करण्याची संधी मिळते. शाळेत असे काही वातावरण निर्माण केले पाहिजे की, जिथे सर्व टीचर कशानं कशात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत असतील. शाळेची रचना अशी हवी आहे की, त्यातून विद्यार्थ्यांना सातत्याने नवनवीन संकल्पना, विचार, आयडिया सुचतील.
आपण माहितीचा साठा करून ठेवण्याला शिक्षण म्हणतो. माहिती साठवणे म्हणजे शिक्षण असेल तर कॉम्प्युटर आणि विद्यार्थ्यांमध्ये काय फरक आहे?
आज जगातल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे गुगल देत आहे. विद्यार्थ्यांनी योग्य प्रश्न विचारावा.. लगेच उत्तर मिळते. शिवाजी महाराज केव्हा जन्माला आले? आंबेडकरांचे पुर्ण नांव काय होते? या सर्वांची उत्तरे गुगल देईल. मग या 21 व्या शतकात टिचर्सची आवश्यकता काय आहेे? आज टीचर्सचा रोल हा शिवाजी महाराज केव्हा जन्मले हा सांगायचा नसून शिवाजींचे गुण, आंबेडकरांचे गुण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कसे रुजतील हा आहे. आता शिक्षणाचा उद्देश हा आयुष्यात येणाऱ्या समस्येची उत्तरे शोधता येणे हा आहे. घर शाळा कॉलेज मध्ये असे काही उपक्रम घ्यायला हवे कि ज्या मध्ये विद्यार्थी विविध समस्यांना तोंड देतील. त्यातून काही स्वत:ची उत्तरे शोधतील. या पद्धतीने शिक्षण मिळाले तरच मुलांना शाळेत टाकण्याचा उद्देश सफल होईल आणि साक्षरतेकडून शिक्षणाकडे वाटचाल सुरु होईल.
- सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

No comments:
Post a Comment